Ravindra Jadeja : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. जड्डू यांच्या पत्नी आमदार रिवाबा जडेजा यांनी ही माहिती दिली.
टीम इंडियाचा क्रिकेटप
जडेजा भारतीय जनता पक्षाचे सदस्य झाला आहे. जामनगरची आमदार आणि रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजाने X वर ही माहिती पोस्ट केली.
जडेजा भाजपचा स्टार प्रचारक
रवींद्र जडेजा अनेकवेळा पत्नी रिवाबा जडेजासोबत प्रचार करताना दिसला आहे. त्याने त्याच्या पत्नीच्या प्रचारासाठी अनेक शोही केले आहेत. पण आता जड्डूने अधिकृतरित्या भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. रिवाबा जडेजाने X वर याचा खुलासा केला आहे.
टू रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अलीकडेच त्याने ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर जडेजा नवीन अध्याय सुरू करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, रवींद्र जडेजाने टी-20 वर्ल्डकप २०२४ नंतर कोणताही सामना खेळलेला नाही. पण तो आता या महिन्यात होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसू शकतो. भारताने टी- विश्वचषक जिंकल्यानंतर जडेजाने टी-२० फॉरमॅटला अलविदा केला होता.
जड्डूने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये ५१५ धावा केल्या
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जडेजाने दमदार कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत ७४ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने ४१ डावात ५१५ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये जडेजाने ५४ विकेट्सही घेतल्या आहेत.
प्लांट-बेस्ड डाइट: फायदे, चुनौतियाँ, और इसे शुरू करने के टिप्स
जडेजाचे कसोटीतील आकडे
रवींद्र जडेजाने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ७२ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने १०५ डावात ३०३६ धावा केल्या. तसेच, या त्याने २० अर्धशतके आणि ५ शतके झळकावली आहेत. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे नाबाद १७५ धावा धावा आहेत. एवढेच नाही तर त्याने कसोटीच्या १३६ डावात २९४ विकेट्ही घेतले आहेत.
रवींद्र जडेजा निवडणूक लढवणार?
टी-20 वर्ल्ड इंटरनॅशनलमधून नुकताच निवृत्त झालेला रवींद्र जडेजा त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. जडेजाने २०२३ मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला होता. जडेजा क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केल्यानंतर सक्रिय राजकारणात दिसू शकतो. विधानसभा निवडणुकीदरम्यान रवींद्र जडेजा पत्नी रिवाबा जडेजाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळताना दिसला होता.
भाजपने सुरू केली सदस्यत्व मोहीम
सत्ताधारी पक्ष भाजपने २ सप्टेंबरपासून पक्षाची सदस्यत्व मोहीम सुरू केली. पक्षाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सर्व केंद्रीय मंत्री, अधिकारी आणि नेत्यांच्या उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात झाली.
Do Follow http://www.kaydajunction.com